ठाणे महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती कै. सुधाकर चव्हाण यांच्या निधनामुळे शिवाईनगरसह संपूर्ण ठाण्यातून शोक व्यक्त होत आहे. रविवारी झालेल्या शोकसभेत सर्वपक्षीय नेते, विविध क्षेत्रातील मंडळी, राज्यभरातील त्यांचे स्नेही-मित्र आवर्जून उपस्थित होते. त्यांचे राजकीय, सामाजिक, कला-क्रीडा अशा विविध क्षेत्रांतील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.