झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली नवी मालिका ‘शिवा’ लोकांच्या मनात घर करण्यासाठी सज्ज आहे. प्रत्येक पात्राला अगदी पहिल्याभागा पासून प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळत आहे. ह्या आठवड्यात प्रेक्षक शिवा या मालिकेत पाहू शकतील शिवा आणि आशुतोषच्या जीवनातल्या होणाऱ्या हालचाली. मंदिरात गुरुजीं आशुतोषचे लवकरच लग्न होणार अशी बातमी देतात, पण देसाईंच्या घरी लक्ष्मी नाही तर दुर्गा प्रकट होणार हे देखील सांगतात, यावर सगळ्यांना धक्का बसतो. तर दुसरीकडे दिव्या शिवाला वधू पाहण्याचा सोहळा थांबवण्याची विनंती करते. दरम्यान, दिव्याच्या या स्वार्थामुळे शिवा अडचणीत येते. येणाऱ्या भागात आपण आपण पाहू शकणार आहोत शिवानी शिवा कशी झाली, शिवाय एका पार्टीत काही पुरुष दिव्याशी गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा शिवा येऊन गुंडांपासून तिला वाचवते आणि तिकडे आशुतोष ही उपस्थित असतो. इकडे आशुचे बाबा रामचंद्र देसाई आशुच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन दिव्याच्या घरी जाणार आहेत. सारख्या येणाऱ्या स्थळांना वैतागून दिव्या स्वतःच्या ऐवजी शिवाची कुंडली दाखवते. आता काय होणार जेव्हा शिवा आणि आशुतोषची कुंडली गुरुजींसमोर येणार? ऍक्शन, इमोशन आणि ड्रामा ने भरलेला पाहायला विसरू नका ‘शिवा’ सोमवार ते शनिवार रात्री ९:०० वा. झी मराठीवर .
मनोरंजन
कलर्स मराठीने अलीकडेच ‘इंद्रायणी’ या नव्या मालिकेची घोषणा केली. येत्या २५ मार्चपासून इंद्रायणी मालिका सर्वांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतील इंद्रायणी नेहमी आपल्या निरागस प्रश्नांनी व खट्याळ स्वभावाने सर्वांना...
झी मराठी घेऊन येत आहे आता पर्यंतचा सर्वात मनोरंजक पिक्चर. ग्लॅमर, स्टाईल, प्रेम,कॉमेडी थ्रिल, एकसाइटमेंट, ऍक्शन ड्रमा, जबरदस्त डांस, गाणी आणि मोठमोठे कलाकार ह्या पिक्चर मध्ये सगळंच आहे. हा...
११ फेब्रुवारी रोजी रंगलेल्या ‘जाऊ बाई गावात’ ह्या बहुचर्चित शो च्या पहिल्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात ‘रमशा फारुकी’ महाविजेती ठरली. रमशाला २० लाखाचा धनादेश आणि जाऊ बाई गावातची मानाची ट्रॉफी...
सोनी मराठी वाहिनी आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आता ‘प्रतिशोध’ झुंज अस्तित्वाची ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. ‘प्रतिशोध’ ही मालिका आई आणि मुलगी यांच्या विशिष्ट नात्यावर भाष्य करणारी थरारक मालिका आहे. तृतीयपंथी आई आणि दिशा नावाची मुलगी यांचं नातं आणि त्यांचा संघर्ष यांची कहाणी या...
‘विश्वामित्र’मधील ‘खोटारडी’ हे अखेरचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वामित्र’ या अल्बममधील तीन गाणी प्रदर्शित झाल्यानंतर आता अखेरचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘विश्वामित्र’, ‘तुझ्याविना’ आणि `दूर दूर’...