उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी काळजी

जिल्हा प्रशासनाचे आवाहन

ठाणे : उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यु होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

उष्णतेच्या लाटेची माहिती देण्याकरिता रेडिओ, टि.व्ही., सोशल मिडीया व स्थानिक वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमांद्वारे नागरिकांना सूचित करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष/ महानगरपालिका नियंत्रण कक्ष/ विभागीय स्तरावरील नियंत्रण कक्ष व स्थानिक संस्था आणि आरोग्य विभाग यांनी एकत्रित कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी संबंधित विभाग, स्थानिक पुढारी व सामाजिक संस्था यांनी सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.