ठाणे: गावदेवी येथील भाजी मंडईला गुरुवारी पहाटे अचानक आग लागली होती. या आगीमध्ये व्यवसायिकांचे नुकसान झाले असून सर्व व्यवसायिक, त्यांच्या नातेवाईकांनी नुकसान भरपाईसाठी लागणारी कागदपत्रे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे जमा करण्यासाठी गर्दी केली होती. अनेकांनी पाच ते १० लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे नुकसान झाल्याचा दावा केला.
भाजी मंडईत कपड्यांची देखील विक्री होत असल्याचे आढळून आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, शुक्रवारी सकाळी व्यवसायिक पुन्हा एकदा मंडईजवळ जमा झाल होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी त्यांच्याकडून कागदपत्र गोळा केली. अनेकांनी त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले.