* ७९३ लिटर दूध संकलित
* २,७०४ बाळांना प्राण वाचल
ठाणे : ठाण्यातील पहिल्या स्तन दूध बँकेने मे २०१२ पासून मार्च २०२२ पर्यंत ७९३.५ लिटर दूधाचे संकलन केले आहे आणि तब्बल १६,४२६ मातांकडून ७१६.९ लिटर दूध वितरित केले. त्यामुळे २,७०४ बाळांना वाचवण्यात यश आले आहे.
ठाण्यातील कन्सल्टंट पेडियाट्रिक सर्जन आणि रोटरीयन डॉ. लक्ष्मीकांत कासट यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग ठाणे जिल्ह्यात प्रथमच राबवण्यात आला आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर बाळाच्या सहा महिन्यांच्या वयापर्यंत आणि जेव्हा बाळ सहसा आईचे दूध सोडते तेव्हा नातेवाईक बँकेतून दररोज दूध आणतात, अशी माहिती डॉ. कासट यांनी ‘ठाणेवैभव’ला दिली. मे २०१२ मध्ये ही संकल्पना प्रत्यक्षात आली तेव्हा ती ठाणे जिल्ह्याची पहिली आणि भारतातील १० वी मिल्क बँक होती. या घटनेला नुकतीच १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या उदात्त योजनेमुळे तब्बल २,७०४ जणांना मृत्यूच्या दारातून माघारी आणले आहे, असे डॉ. कासट यांनी सांगितले.
निरोगी बाळ असलेल्या आणि कोणत्याही निरोगी स्तनदा माता स्वेच्छेने त्यांचे दूध दान करण्यास इच्छुक आहेत, त्या संभाव्य दात्या बनतात. ‘वेल बेबी क्लिनिक’मध्ये असलेल्या माता, ज्या मातांचे बाळ एनआयसीयूमध्ये आहे तसेच रुग्णालयांमध्ये स्तनपान करवणारे कर्मचारी आणि समाजातील प्रेरित मातादेखील अशा ‘स्तन दूग्धदाता’ बनतात.
मुंबई महापालिकेच्या शीव रुग्णालयातील पहिली ‘स्तन दूध बँक ’ ही आशियातील पहिली ‘स्तन दूध बँक’ओळखली जाते. सन १९८९ मध्ये या रुग्णालयात डॉ. आर्मेडा फर्नांडिस यांनी याची सुरुवात केली होती.डॉ. कासट यांची ओळख ‘डॉ. लकी ’ असून, ते रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एंड आणि ठाणे अकादमी ऑफ पेडियाट्रिक्सचे अध्यक्ष होते. ही संकल्पना त्यांचीच असून त्यांनी ती अंमलात आणली. बाळाचा जन्म झाल्यानंतर १३ ते १७ % नवजात जन्माच्या पहिल्या सहा महिन्यांत केवळ मातेच्या दुधावर असल्यास मृत्यूही त्याच्यापासून दूर राहतो. ही वस्तुस्थिती आहे. ‘वेट नर्सिंग’ ही संकल्पना भारतीय संस्कृतीला नवीन नसून, ती नव्या वेष्टनात मांडण्यात आली आहे. ‘मी याचे नेतृत्व केले असले तरी हा सांघिक प्रयत्न असल्यामुळे या बँकेचे व्यवस्थापन व्यवस्थापकीय संचालक आणि कळवा येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभाग प्रमुख प्रा.डॉ.वंदना कुमावत करतात. रोटेरियन योगेश मल्होत्रा आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई नरिमन पॉइंटचे अध्यक्ष राजेश बोकाडिया यांनी या बँकेची व्यवस्था केली होती.
‘ठाणे अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स’, रोटरी क्लब ऑफ मुंबई नरिमन पॉइंट, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एंड आणि रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजय जालान यांनी दिलेल्या निधीमुळे ही ‘बँक’उघडण्यात आली, सन २०१२ मध्ये एकूण १२ लाख रुपये देण्यात आले होते. सन २०१९ मध्ये ‘रोटरी क्लब ऑफ मुंबई एलिगंट’सह अॅक्सिस इलेक्ट्रिकल घटकाद्वारे पहिल्या ‘स्तन दूध बँक ’चे नूतनीकरण करण्यात आले.
‘स्तन दूध बँक’च्या व्यवहारासंबंधी डॉ. कासट म्हणाले, ‘आईचे दूध दात्यामातांकडून स्वहस्ते किंवा स्तन पंप वापरून दिले जाते. गोळा केलेले कच्चे दूध पाश्चराईज केले जाते आणि नंतर सेरोलॉजिकल रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत लगेच रेफ्रिजरेट केले जाते. ३७ अंशापेक्षा जास्त नसलेल्या तापमानात किंवा वाहत्या कोमट पाण्याखाली पाण्याच्या आंघोळीत दूध वेगाने ‘डिफ्रॉस्ट’ करून गोठलेले दूध वितळवले जाते. या संपूर्ण लेखी मानक ऑपरेटिंग प्रक्रियेचे (एसओपी) पालन केले जाते आणि संबंधित रेकॉर्डची गोपनीयता राखली जाते.
निओनॅटोलॉजीचे विभाग प्रमुख ‘स्तन दूध बँक’ चे संचालक असून, लॅब तंत्रज्ञ, बालरोग, रक्त बँकिंग, पोषण आणि/किंवा इतर योग्य क्षेत्रातील अनुभव असलेले डॉक्टर, संसर्गजन्य रोगांमध्ये तज्ज्ञ असलेल्या किमान एक सदस्यासह समुपदेशकाशिवाय स्तनपान आणि संबंधित आरोग्य कर्मचारी यांची जबाबदारी ठरवून दिली आहे. दैनंदिन तपासणी किंवा दैनंदिन अहवाल लिहीणेदेखील हा जबाबदारीचा भाग आहे.
‘दूध बँक’ देणगीदाराची लेखी संमती घेते आणि ‘दूध बँकिंग’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्वीकारल्याबद्दल माहिती दिल्यानंतर स्वाक्षरी केलेला अर्ज बँकेला द्यावा लागतो. त्यानंतर ‘मिल्क बँक’देखील दूध दात्यांसाठी शिक्षण कार्यक्रम राबवून दात्यांना संपूर्ण माहिती देते.
‘स्तन दूध बँक’ देणगीदारांना पूर्व-निजंर्तुकीकृत, ‘लीक-प्रूफ कंटेनर’ आणि ‘कंटेनर सील’ पुरवते. कंटेनरवर चिकटवलेल्या टॅगमुळे प्राप्तकर्त्यांची ओळख होते आणि विविध मातादात्यांकडून गोळा केलेले दूध निजंर्तुक स्टीलच्या कंटेनरमध्ये गोळा केले जाते, त्याच्या नोंदी नोंदवल्या जातात आणि त्यांची देखभाल केली जाते. त्यानंतर कडक निजंर्तुकीकरण स्थितीत ६६ अंश सेल्सिअस तापमानात ३० मिनिटांपर्यंत बँकेत दूध पाश्चराइज केले जाते. ते थंड झाल्यावर, प्रत्येक कंटेनरमधील नमुने चाचणीसाठी पाठवल्या जाणा-या चाचणी ट्यूबमध्ये काढले जातात आणि त्याचा अहवाल मिळण्यासाठी २४ ते ४८ तास लागतात. स्टीलच्या डब्यातील उरलेले दूध (नमुने काढल्यानंतर) रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले जाते. प्रत्येक कंटेनरवर कंटेनरचा अनुक्रमांक आणि तारखेचा ‘टॅग’ चिन्हांकित केला जातो. दूध संकलन ज्या कंटेनरमधून दूध हस्तांतरित केले होते आणि पाश्चरायझेशननंतर असलेल्या कंटेनरचा अनुक्रमांक आणि पाश्चरायझेशनची तारीख त्यावर नोंदवण्यात येतेच, असे डॉ. लकी कासट यांनी सांगितले.
कंटेनर डिस्पेंस करण्यापूर्वी किंवा डीप फ्रीझरमध्ये हलवण्याआधी प्रयोगशाळेच्या अहवालाच्या निकालांची प्रतिक्षा करतात. सुरुवातीच्या तारखांचे कंटेनर प्रथम वितरित केले जातात. कंटेनर जितके जुने असतील तितके ते डीप फ्रीजरमध्ये पडलेले असले तरीही प्रथम ते वितरित केले जावेत याचीही आणि वितरणाच्या नोंदी काटेकोरपणे ठेवल्या जातात. प्राप्तकर्त्यांना दिलेल्या दुधाचे ‘क्लिनिकल रेकॉर्ड’ आणि त्यामुळे होणारे परिणामदेखील ठेवले जातात.
‘ह्युमन मिल्क बँक’ एसओपी नियमांचे पालन करते. दुधाचे वितरण पूर्णपणे प्राप्तकर्त्याच्या आईच्या देणगीच्या बदलावर केले जाते. संबंधित विभागप्रमुखाकडून आदेश मिळाल्यावरच दुधाचे वितरण केले जाते. वरील सर्व तपशिलांचे रेकॉर्ड वितरीत करण्यात आलेल्या दुधाची मागणी आणि कोणाकडे नोंदवलेली आणि ठेवली जाते, अशी माहिती डॉ. लकी यांनी दिली.