ठाणे : वेगवेगळ्या प्रसंगी रक्तदान शिबिराचे होणारे आयोजन आपल्याला नेहमीच पहायला मिळते. पण आपल्या मुलांच्या प्रशिक्षकाच्या पन्नासाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून पालकांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबीर आयोजित के ल्याचे ठाणेकरांना शनिवारी पहायला मिळाले.
सरस्वती क्रीडा संकु लात मागील अनेक वर्षांपासून राज्य शासनाचे जेष्ठ प्रशिक्षक महेंद्र बाभूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिम्नॅस्टिक खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. या काळात महेंद्र बाभूळकरांच्या मार्गदशनामुळे शेकडो जिम्नॅस्टनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर छाप पाडत पदकांची लयलूट के ली आहे.एरवी पालकांचे आणि मुलांच्या प्रशिक्षकांशी वाद होतच असतात. पण बाभूळकर त्यास अपवाद ठरलेत. स्वतःला मुलांच्या प्रशिक्षणात गुंतवून मुलांसाठी आखण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या समन्वयाची जबाबदारी त्यांनी पालकांवर सोपवली आहे. त्यामुळे पालक आणि महेंद्र बाभूळकर यांच्यात वेगळेच संबंध तयार झाले आहेत. त्यामुळेच महेंद्र बाभूळकर यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करताना पालकांनी पुढाकार घेत रक्तदान शिबिराचे आयोजन के ले होते.
सरस्वती क्रीडा संकु लात वामनराव ओक रक्तपेढीच्या सहकार्याने पार पडलेल्या या रक्तदान शिबिरात एकू ण ५३ युनिट्स रक्त जमा करण्यात आले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महेंद्र बाभूळकर, जतिन शहा, अपर्णा जोशी, समीर पत्रिकर, भुषण आंबेकर, जगदिश मोरे, अतुल गवारे, मयूर बवुवा, केशव पाटणकर, सचिन राऊळ, शैलेश दळवी, श्रद्धा जमेनिस, अभिजित परिचारक, सरिता भावसार यांनी विशेष परिश्रम घेतले.