जुनांदुर्खी सरपंचपदी भाजपच्या भारती ठाकरे बिनविरोध 

भिवंडी : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत जुनांदुर्खी शिवाजी नगर टेंभिवली राजकीयदृष्ट्या महत्वाची मानली जाते. नुकताच जुनांदुर्खी ग्रामपंचायतीचे मावळते सरपंच महेंद्र पाटील यांचा कार्यकाल संपल्याने आपसांत ठरल्याप्रमाणे सरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली.

तुषार राऊत यांनी अध्यासी अधिकारी म्हणून कार्य पार पाडून सरपंचपदी भारती ठाकरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. बिनिवरोध निवडणुकीत मावळते सरपंच महेंद्र पाटील, उपसरपंच कोमल शिकारी, सदस्य प्रेमनाथ भगत, संजय पाटील, मनिषा पाटील, वसंत पाटील, बारक्या सातवी, कल्पना घरत, यशोदा मढवी, रोशना खरपडे सदस्यांनी सहभाग घेतला.

बिनविरोध निवड होताच भारती हरिश्चंद्र ठाकरे यांच्या समर्थकांकडू‌न जोरदार आतिषबाजी मिरवणुकीसह जल्लोष करण्यात आला. यावेळी गांवचे उद्योगपती नारायण जाधव, ललित जाधव, भाजपचे नेते वसंत पाटील, युवा नेते योगेश पाटील, अरुण जाधव इत्यादींनी उपस्थित राहु‌न नवनिर्वाचित सरपंच भारती ठाकरे यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जुनांदुर्खी ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी निवडी दरम्यान माजी सरपंच महेंद्र पाटील प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की, मला मिळालेल्या एक वर्षाच्या कार्यकाळात अनेक विकास कामे राबवून गावाचे सर्वागीण विकासासाठी कार्य पार पाडले आहे. पुढे देखील नवनिर्वाचित सरपंच भारती ठाकरे व सर्वांच्या सहकार्याने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जी उर्वरित विकासाची कामे आहेत, ती कामे पूर्ण करण्याचा संकल्प नवनिर्वाचित सरपंच भारती ठाकरे यांनी केला आहे.