वाढदिवसानिमित्त भाजपा नगरसेवकाने वॉर्डात लावले ४० सीसीटीव्ही कॅमेरे

उल्हासनगर : उल्हासनगरमधील भाजपचे नगरसेवक राजेश वधारिया यांनी वाढदिवस साजरा न करता मेरा वार्ड सुरक्षित वार्ड चा नारा देत संपूर्ण प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसून वॉर्ड सुरक्षित करीत गुन्हेगारीला आळा घातला आहे.

उल्हासनगर महापालिकेचे भाजपाचे जेष्ठ नगरसेवक म्हणून राजेश वधारिया हे मागील अनेक वर्षांपासून शिरू चौक परिसराचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्या प्रभागात अनेक विकासकामे पूर्णत्वास आली आहे. त्यांच्या प्रभागात पाण्याची समस्या शून्य असल्याने त्यांना वॉटर मॅन म्हणून ओळखले जाते. त्यांचा बुधवारी ५३ वा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला करण्यात आला. मेरा वार्ड सुरक्षित वार्ड चा नारा देत संपूर्ण प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्याचं लोकार्पण आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते करण्यात आलं. वॉर्डात होणा-या चो-या, महिला छेडछाड, सोनसाखळी खेचण्याच्या घटना  यासह महत्त्वाच्या घटना घडामोडींवर सीसीटीव्हीचे बारीक लक्ष राहणार आहे.

याबाबत राजेश वधारिया यांनी सांगितले की संपूर्ण वॉर्डमध्ये सीसीटीव्ही लावले असून त्याची लिंक स्थानिक पोलीस ठाणे, पोलीस उपायुक्त कार्यालय आणि वाहतूक शाखेला दिली आहे. तसेच ह्या सीसीटीव्हीचे थेट प्रक्षेपण माज़्या कार्यालयात टीव्हीवर सुरू राहणार आहे, त्यामुळे कोणत्याही सीसीटीव्ही एक दिवस देखिल बंद राहणार नाही, अस नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले. राजेश वधारिया यांच्या ह्या विकासकामामुळे गुन्हेगारीला आळा बसणार असल्याने स्थानिक भाजप आमदार कुमार आयलानी यांनी त्यांचे कौतुक केले. स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, भाजप जिल्हाअध्यक्ष जमनू पुरस्वानी, नगरसेवक महेश सुखरामनी, प्रकाश माखिजा, समाजसेवक अमित वाधवा, अजित सिंग लबाना, लढा कामगार संघटनेचे संदीप गायकवाड आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.