कारच्या धडकेत बाईकस्वार ठार

उल्हासनगर : भरघाव वेगाने मारुती कारने जाणाऱ्या वाहनचालकाने मोटारसायकलस्वार प्रकाश शिवलदास सचदेव ( 54 ) याला जोरदार धडक दिल्यामुळे तो जागीच ठार झाला. काल रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

प्रकाश सचदेव हे त्यांच्या स्कुटीवरून अंबरनाथ-काटई महामार्गावर काकाचा धाबा जवळून काल रात्री 7.30 वाजताच्या सुमारास जात होते. दरम्यान याचवेळी समोरून मारुती सुझुकी अल्टो या कारने सोपान टोहके ( 37 ) भरघाव वेगाने येत होता. त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने सचदेव याला धडक दिली. या अपघातात सचदेव गंभीररीत्या जखमी झाला आणि तो जागीच ठार झाला.

या संदर्भात हिललाईन पोलीस ठाण्यात आरोपी सोपान टोहके याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे . पोलीस उपनिरीक्षक पऱ्हाड हे करीत आहेत.