भुवनेश्वर कुमारचा नवा पराक्रम, इरफान पठानलाही टाकलं मागं

सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) आयपीएलच्या पंधराव्या हंगामात नव्या विक्रमाला गवसणी घातली.

सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) आयपीएलच्या पंधराव्या हंगामात नव्या विक्रमाला गवसणी घातली. त्यानं आयपीएलमध्ये सर्वाधिक निर्धाव षटक टाकणाऱ्या गोलंदाज्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. तसेच भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणला (Irfan Pathan) मागं टाकलंय. मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) सामन्यात भुवनेश्वर कुमारनं हा पराक्रम केलाय.

मुंबई विरुद्ध सामन्यात भुवनेश्वर कुमारनं रचला विक्रम
आयपीएलमध्ये सर्वाधिक निर्धाव षटक टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारताचा माजी गोलंदाज प्रवीण कुमार अव्वल स्थानी आहे. त्यानं आयपीएलमध्ये सर्वाधिक 14 वेळा निर्धाव षटक टाकलंय. तर, भुवनेश्वर कुमारनं मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात त्याच्या आयपीएलमधील कारकिर्दीतलं अकरावं निर्धाव षटक टाकलं आहे. या कामगिरीसह भुवनेश्वर कुमारनं इरफान पठाणला मागं टाकलं. इरफान पठाणनं त्याच्या आयपीएलच्या संपूर्ण कारकिर्दीत 10 निर्धाव षटक टाकली आहे. या यादीत मुबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज तिसऱ्या क्रमांकावर आहे. बुमराहनं आयपीएलमध्ये आतापर्यंत आठ वेळा निर्धाव षटक टाकलं आहे. याशिवाय, संदीप शर्मा आणि धवल कुलकर्णी यांच्याही नावावर आठ वेळा निर्धाव षटक टाकण्याची नोंद आहे.

भुवनेश्वर कुमारचं आयपीएलमधील कामगिरी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात भुवनेश्वर कुमारनं चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. यंदाच्या हंगामात त्यानं हैदराबादकडून 13 सामने खेळले आहेत. ज्यात 12 विकेट्स घेतल्या आहेत. 22/3 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. भुवनेश्वर कुमारनं आयपीएलच्या कारकिर्दीत एकूण 145 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 154 विकेट्स घेतले आहेत. त्यानं दोन वेळा चार किंवी त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. भुवनेश्वरसाठी आयपीएल 2017 चांगलं ठरलं होतं. यामध्ये त्यानं 26 विकेट घेतल्या होत्या.