काँग्रेसची गांधीगिरी
ठाणे : केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात देशातील सर्व शेतकरी संघटना व डाव्या आघाड्यांनी सोमवारी २७ सप्टेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले होते. त्या बंदला ठाण्यातील काँग्रेस पक्षाने जाहीर पाठींबा देऊन गांधीगिरी केली, परंतु दुकानदार आणि अस्थापनांनी अल्प प्रतिसाद दिला.
ठाणे शहर काँग्रेसच्या(जिल्हा) काँग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते स्टेशन रोड परिसरातील दुकानदारांकडे जाऊन गांधीगिरी करीत बंदमध्ये सामील व्हा असे आवाहन करीत फिरताना दिसत होते. याप्रसंगी ठाणे काँग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे, भालचंद्र महाडिक, सुखदेव घोलप आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
आज भारत बंदसाठी सर्व व्यापारी वर्गाला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांवर गांधीगिरी करत सहकार्य करण्याची विनंती केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.