ठाणे: मे महिन्यात पुणे येथील हॉटेल ‘द वेस्टिन’ येथे झालेल्या १० व्या ऑल इंडिया अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग समिट आणि पुरस्कार २०२६ मध्ये ‘टिअर-३’ बँकांच्या श्रेणीत “बेस्ट मोबाईल बँकिंग इनिशिएटिव्ह’ हा बहुमानाचा पुरस्कार बँकेला मिळाला आहे.
सदर पुरस्कार सोहळ्यात भारतातील १८ राज्यातील एकूण २०० पेक्षा जास्त सहकारी बँका व संस्था सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात भारतातील विविध राज्यातून आलेले अनेक राष्ट्रीय स्तरावरील मान्यवर उपस्थित होते.
हा पुरस्कार ठाणे भारत सहकारी बँकेच्या तंत्रज्ञान आणि ग्राहक सेवेतील सातत्यपूर्ण प्रयत्नांची पोचपावती असून, हा पुरस्कार बँकेच्या निष्ठावान ग्राहक, सभासद, संचालक आणि कर्मचाऱ्यांच्या विश्वासाचे प्रतिक आहे. आज मितीस बँकेच्या ३१ शाखा कार्यरत आहेत.