ठाण्यात कोरोना संसर्गाचा आलेख खाली

ठाणे : शहरातील नवीन कोरोना रुग्णांचा आलेख खाली आला असून आज ३६ रुग्णांची भर पडली तर एकही जण दगावला नाही.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार सुरू असलेल्या रूग्णांपैकी ४२जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ९०,४८१ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ३००जणांवर उपचार सुरू आहेत. आज एकही जण दगावला नसून आत्तापर्यंत २,१४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील ८९७ नागरिकांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये ३६जण बाधित सापडले आहेत. आत्तापर्यंत २४ लाख ८७,३६९ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ९२,९२५ रूग्ण बाधित मिळाले आहेत.