कल्याण : प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवसेना शिंदे गटाच्या वतीने कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याजवळ घंटानाद आंदोलन करण्यात आले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या पुढाकाराने सुरू झालेले हे आंदोलन त्यांच्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी 20 वर्षे कायम ठेवले आहे. त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली.
बकरी ईदच्या दिवशी कल्याण येथील मुस्लिम बांधव एकत्रितपणे येऊन दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरात नमाज पडतात. कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून नमाज कार्यक्रम संपेपर्यंत कोणालाही दुर्गाडी देवीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी सोडत नाहीत. शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी 38 वर्षांपूर्वी म्हणजेच 1986 च्या दशकात या घंटानाद आंदोलनाला प्रारंभ केला. तेव्हापासून आजतागायत दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी शिवसेनेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे.
यावेळी कल्याणच्या लोकमान्य टिळक चौक येथून सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने कूच केले. मात्र पोलीस प्रशासनाने या दोन्ही गटांना लालचौकी परिसरातच बॅरिकेट्स लावून रोखून धरले. ज्या ठिकाणी काही काळ पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्कीही झाली. तर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजीही केली जात होती.
यावेळी आंदोलनात कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, आमदार विश्वनाथ भोईर, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख रवी पाटील, महेश गायकवाड, राजेश मोरे, माजी नगरसेवक जयवंत भोईर, मोहन उगले, गणेश जाधव, मयूर पाटील, श्रेयस समेळ, सुनील खारुक, विजया पोटे, नेत्रा उगले, महेश पाटील, रमाकांत देवळेकर, चैनू जाधव आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.