फेब्रुवारीत बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या

मुंबई : वर्षाचा पहिला महिना लवकरच संपणार असून, फेब्रुवारी सुरू होणार आहे. शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांव्यतिरिक्त फेब्रुवारीमध्ये वसंत पंचमी, छत्रपती शिवाजी जयंती आदींनिमित्त अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत.

फेब्रुवारीच्या २९ दिवसांपैकी ११ दिवस बँकांना सुट्ट्या राहणार आहेत. यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महिना सुरू होण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते, जेणेकरून ग्राहकांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागू नये. बँक ही एक आवश्यक वित्तीय संस्था आहे. त्यामुळे दीर्घ सुट्टी असताना अनेक महत्त्वाची कामे रखडतात.

‘या’ दिवशी बँका बंद राहणार

४ फेब्रुवारी २०२४ – रविवार असल्याने देशभरात बँका बंद राहणार आहेत. १० फेब्रुवारी रोजी महिन्याच्या दुसऱ्या शनिवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल. ११ फेब्रुवारीला रविवारमुळे संपूर्ण देशात बँका बंद राहतील. १४ फेब्रुवारीला वसंत पंचमी किंवा सरस्वती पूजेमुळे आगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता येथे बँका बंद राहतील. १५ फेब्रुवारीला Lui-Ngai-Niमुळे इन्फाळमधील बँकांना सुट्टी असेल.
१८ फेब्रुवारी रोजी रविवार असल्यामुळे संपूर्ण देशात सुट्टी असेल. १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी जयंतीनिमित्त मुंबईत बँका बंद राहतील. २० फेब्रुवारीला राज्य दिनानिमित्त आयझॉल आणि इटानगरमध्ये बँका बंद राहतील.
२४ फेब्रुवारीला दुसऱ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील. २५ फेब्रुवारी रोजी रविवारमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
२६ फेब्रुवारीला Nyokum मुळे इटानगरमधील बँकांना सुट्टी असेल.