बालाजी प्रीमिअर लीगच्या अंतिम सामन्यात बालाजी फायटर विजयी

डोंबिवली : २६ जानेवारी रोजी बालाजी प्रीमिअर लीग (२०२२) चे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यात बालाजी फायटर संघाने बाजी मारत विजय मिळवला. बालाजी फायटर संघात कर्णधार वैभव मोरे यासह सिद्धेश खेडेकर, प्रशांत चव्हाण, सुनील पठारे, वृषभ मोरे, जितेंद्र चौरासीया, अक्षय सोलकर, अजित सोलकर, विजय कोठीया, मनीष नारकर, महेंद्र चव्हाण हे खेळाडू खेळत होते.

प्रशांत चव्हाण याची उत्कृष्ट फलंदाजी, सिद्धेश खेडेकर, वैभव मोरे, वृषभ मोरे, सुनील पठारे यांची उत्कृष्ट गोलंदाजी तसेच संघाने केलेल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे अटीतटीच्या सामन्यात पारितोषिक पटकावले. बालाजी प्रीमिअर लीग २०२२ मध्ये टी- शर्टचे सौजन्य समाजसेवक रवी तागडकर यांचे लाभले. निमेश छेडा यांच्या हस्ते विजयी संघाला सन्मानचिन्ह देऊन उत्कृष्ट फलंदाज अमर चव्हाण, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण विराज सोंडकर, उत्कृष्ट गोलंदाज राकेश यांना विशेष पारितोषिक दिले. प्रदीप शिंदे, गणेश कदम आणि अजय सोलकर यांनी पंच म्हणून काम पाहिले.