आयुष आंबेकरची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) U16 पय्याडे ट्रॉफीसाठी निवड झाली आहे. तो एक लेग स्पिनर आणि टॉप-ऑर्डर फलंदाज आहे, ज्याने अलीकडे काही चांगली प्रदर्शने केली आहेत. त्याने कल्पेश कोळी स्पर्धेत (MCA U16 निवड स्पर्धा) सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. त्या सामन्यात त्याने सहा विकेट्स घेतल्या.
हृषिकेश पुराणिक यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवलीतील क्रिकेट एक्स्प्लेन्ड क्रिकेट अकादमीमध्ये आयुष प्रशिक्षण घेत आहे. त्याचे प्रशिक्षक म्हणतात, “आयुष वयाच्या नऊव्या वर्षापासून माझ्या अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. तो आमचा शिष्यवृत्तीचा खेळाडू आहे. त्याने क्रिकेटची सुरुवात वेगवान गोलंदाज म्हणून केली असली तरी, मी त्याच्यातील प्रतिभा आणि कौशल्ये ओळखली, ज्यामुळे तो एक उत्तम लेगस्पिनर बनू शकतो. आम्ही रोज सहा तास सर्व करतो. याशिवाय, मॅच टेम्परामेंट विकसित करण्यासाठी मी त्याला त्याच्याहून वयानी मोठ्या असलेल्या मुलांसोबत खेळायला लावले.”
MCA U16 पय्याडे ट्रॉफीसाठी आयुषची निवड झाल्याने तो आता U16 स्तरावर मुंबईच्या शीर्ष ६० खेळाडूंमध्ये सामील झाला आहे.