ठाणे: ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी रिपब्लिकन बहुजन सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात भीम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रिपब्लिकन बहुजन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी मैदान येथे पक्षाचा १०वा वर्धापन दिन आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ गंगाराम इंदिसे, कैलाश म्हापदी, गायक, गीतकार प्रभाकर पोखरीकर आशा शरणागत आदींना भीम गौरव २०२४ पुरस्काराने गौरविण्यात आले.
बहुजन समाज आणि आंबेडकरी चळवळीसाठी ज्यांनी योगदान दिले आहे अशा मान्यवरांना भीम गौरव पुरस्काराने गौरविण्यात आल्याचे विजय घाटे यांनी सांगितले.
यावेळी अंध गायकांनी कव्वाली गायन करून उपस्थितांची मने जिंकली.