ठाणे : राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजित पवार यांना ठाणे, मुंबई, मुंबई उपनगरे, नवी मुंबई, रायगड व पालघर या जिल्ह्यांच्या महसूल हद्दीतून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे.
पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर हल्ल्याप्रकरणी अभिजित पवार यांच्यासह हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि विशंत गायकवाड या चाैघांवर गुन्हा दाखल आहे. या चौघांपैकी पवार यांच्यावर तडीपारीची कारवाई पाेलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी केली.
या चौघांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आहेर यांना मारहाण केली होती. नौपाडा पोलिस ठाण्यात आ. आव्हाड यांच्यासह सातजणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. नौपाडा पोलिसांनी अभिजित पवार याच्यासह चौघांना अटक केली होती.