ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स १६ वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने

Photo credits: AP & ANI

लागोपाठ दोन विजयांसह, पाच वेळा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया त्यांच्या विश्वचषक मोहिमेची निराशाजनक सुरुवात विसरून आता आत्मविश्वासाने भरले आहेत. ऑस्ट्रेलियाचा पुढचा सामना त्या संघाशी होणार आहे ज्यांनी काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेला एक धक्कादायक पराभव दिला.

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चा २४ वा सामना ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स यांच्यात २५ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

 

ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने

ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स यांनी एकमेकांविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळले असून ऑस्ट्रेलियाने दोन्ही जिंकले आहेत. हे दोन संघ केवळ २००३ आणि २००७ च्या विश्वचषकादरम्यान आमनेसामने आलेले.

  ऑस्ट्रेलिया नेदरलँड्स
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट) १४
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने (विश्वचषकात)

 

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्सची आतापर्यंतची कामगिरी

ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये आपला पाचवा सामना खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियाने त्यांचे पहिले दोन गमावल्यानंतर त्यांचे मागील दोन सामने जिंकून विजयाची लय परत मिळवली आहे, तर नेदरलँड्सने आतापर्यंत स्पर्धेत एक सामना जिंकला आहे आणि तीन गमावले आहेत.

सामना क्रमांक ऑस्ट्रेलिया नेदरलँड्स
भारताकडून ६ विकेटने पराभव पाकिस्तानकडून ८१ धावांनी पराभव
दक्षिण आफ्रिकेकडून १३४ धावांनी पराभव न्यूझीलंडकडून ९९ धावांनी पराभव
श्रीलंकेचा ५ विकेटने पराभव दक्षिण आफ्रिकेचा ३८ धावांनी पराभव
पाकिस्तानचा ६२ धावांनी पराभव श्रीलंकेकडून ५ विकेटने पराभव

 

संघ

ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबूशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.

नेदरलँड्स: स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास दे लीड, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्व, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लाईन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकर, शरीझ अहमद, सायब्रँड एंजेलब्रेक्ट.

 

दुखापती अपडेट्स

ट्रॅव्हिस हेड ज्याचा दावा हात फ्रॅक्चर झालेला, आता बरा झाला आहे. तो ऑस्ट्रेलियाच्या संघात सामील झाला आहे. जर तो नेदरलँड्सच्या सामन्यासाठी फिट घोषित झाला तर तो फलंदाजीची सुरुवात करू शकतो. लेग स्पिनर अॅडम झाम्पाच्या पाठीत दुखणे ही ऑस्ट्रेलियासाठी इतर दुखापतीची चिंता असू शकते. नेदरलँडसाठी, फिटनेसच्या कोणत्याही समस्या नाहीत.

 

खेळण्याची परिस्थिती

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. या स्पर्धेतील चौथा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाने दोन जिंकले आणि दुसर्‍या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी एक विजय मिळवला. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या ३२८ आहे आणि दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या २७१ आहे. फलंदाजीसाठी परिस्थिती अनुकूल असली तरी फिरकी गोलंदाजांना काही मदत मिळू शकेल.

 

हवामान

हवामान धुके राहण्याची शक्यता आहे. दिवसभरात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. ढगांचे आच्छादन आणि पावसाची शक्यता नाही. उत्तर-वायव्येकडून वारे वाहतील.

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानविरुद्धच्या मागील सामन्यात शतक झळकावले. तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने चार सामन्यांमध्ये ५७ च्या सरासरीने आणि १०९ च्या स्ट्राईक रेटने २२८ धावा केल्या आहेत. गोलंदाजी विभागात, अॅडम झाम्पा हा ऑस्ट्रेलियासाठी चार सामन्यांत नऊ विकेट्स घेऊन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.

नेदरलँड्सचा अष्टपैलू बास दे लीड बॅट आणि बॉलने चांगले योगदान करत आला आहे. त्याने चार सामन्यांत सात विकेट्स घेतल्या आहेत आणि एका अर्धशतकासह ९३ धावा केल्या आहेत. याशिवाय कर्णधार आणि मधल्या फळीतील फलंदाज स्कॉट एडवर्ड्सने उपयुक्त धावा केल्या आहेत. त्याने चार सामन्यांत ४१ च्या सरासरीने आणि १०९ च्या स्ट्राईक रेटने १२४ धावा केल्या आहेत.

 

आकड्यांचा खेळ

  • डेव्हिड वॉर्नर (५) रिकी पाँटिंगला, ज्याने विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक शतके (५) केली आहेत, त्याला मागे टाकण्यापासून एक शतक दूर आहे
  • स्टीव्ह स्मिथ त्याचा १५० वा एकदिवसीय सामना खेळणार आहे. त्याला विश्वचषकात १००० धावा पूर्ण करण्यासाठी ९४ धावांची गरज आहे
  • मिचेल मार्शला एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५०० धावा पूर्ण करण्यासाठी ८९ धावांची गरज आहे
  • मार्कस स्टॉइनिसला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५०० धावा पूर्ण करण्यासाठी ५४ धावांची गरज आहे. त्याचबरोबर त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ४ विकेट्सची आवश्यकता आहे

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: २५ ऑक्टोबर २०२३

वेळ: दुपारी २:०० वाजता

स्थळ: अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार

 

 

(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)