राष्ट्रपतींच्या हस्ते आ. प्रताप सरनाईक यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवात राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे सन २०२०-२१ महाराष्ट्र विधानसभा ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आमदार प्रताप सरनाईक यांना प्रदान करण्यात आला.

मला मिळालेला पुरस्कार ही ठाणेकरांसाठी अत्यंत आनंद आणि अभिमानाची बाब आहे. कोरोना काळात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या गंभीर परिस्थितीचे वास्तव आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानभवनात अवगत करून दिले होते. या भाषणासाठी आमदार प्रताप सरनाईक यांना उत्कृष्ट भाषण पुरस्काराने सन्मानित केले.

महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते हा पुरस्कार स्वीकारून अत्यंत आनंद झाला. यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी निश्चितच नव्याने बळ मिळेल, असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले.

यावेळी राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेच्या उपसभापति डॉ. नीलम गोऱ्हे आणि इतर उपस्थित होते.