ठाणे ‘एफडीए’च्या सहाय्यक आयुक्तांना लाच घेताना अटक

ठाणे : येथील ‘एफडीए’च्या सह- आयुक्त (कोकण विभाग) अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे वागळे इस्टेट कार्यालयातील ‘परिमंडळ-६‘चे सहायक आयुक्त (औषधे-कोकण) विभागातील डॉ. दीपक मालपुरे (५७) यांना २५ हजार रुपये लाच स्वीकारताना ताब्यात घेतले आहे. डॉ.मालपुरे यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली होती.

यातील तक्रारदार यांनी नव्याने मेडीकल दुकान सुरु करण्यासाठी डॉ. मालपुरे यांना संपर्क केला होता. मात्र, तक्रारदाराने मेडीकल दुकानाचा परवाना मिळण्यासाठी सह-आयुक्त (औषधे-कोकण विभाग) हे ५० हजार रुपयांची मागणी करत असल्याबद्दल तक्रार केली होती.

त्यांच्याविरुद्ध तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी कारवाईत लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे मेडीकल स्टोअरचा परवाना मंजूर करण्याकरीता २५ हजार रुपये स्विकारले असताना त्यांना ठाणे येथील कार्यालयात लाचेच्या मागणी रकमेसह सापळा पथकाने रंगेहात पकडले आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.
या सापळ्यासाठी ठाणे एसीबीचे मार्गदर्शन अधिकारी पोलीस अघिक्षक सुुनिल लोखंडे यांच्यासह अतिरिक्त अधिक्षक गजानन राठोठ आणि अतिरिक्त अधिक्षक महेश तरडे हे अधिकारी होते.

डॉ. दीपक मालपुरे हे येत्या ऑक्टोबर २०२४ रोजी शासकीय सेवेतून निवृत्त होणार आहेत. परंतु, त्यांनी लाच घेतल्याची माहिती त्यांच्या अधिकारी आणि कर्मचा-यांना कळल्यानंतर त्यांच्या भूवया उंचावल्या आहेत.