ठाण्यात कोरोना संसर्ग वाढताच

ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांचा आलेख चढताच असून आज २६२ रुग्णांची भर पडली आहे तर २९७जण रोगमुक्त झाले आहेत.

महापालिका हद्दीत सर्वाधिक १११ माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात वाढले आहेत. वर्तकनगर प्रभाग समिती येथे ४५, उथळसर प्रभाग समिती भागात ४४, कोपरी पाचपाखाडीमध्ये १८, लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती येथे १७ आणि कळवा प्रभाग समिती परिसरात १३ रुग्णांची नोंद झाली आहे. प्रत्येकी सहा रूग्ण वागळे आणि दिवा प्रभाग समितीमध्ये नोंदवले गेले आहेत तर अवघा एक रूग्ण मुंब्रा प्रभाग समितीमध्ये सापडला आहे. एका रुग्णाच्या घरचा पत्ता मिळू शकला नाही.

घरी आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी २९७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८४,३२६जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी २,१४८ जणांवर उपचार सुरू आहेत. एकही रूग्ण आज दगावला नसून आत्तापर्यंत २,१३१जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील १,३६६ नागरिकांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये २६२जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २४ लाख ५३,२३८ नागरिकांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८८,६०५ जण बाधित सापडले आहेत.