मीरारोड : मीरा-भाईंदर शहरातील पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी नालेसफाई अद्याप सुरू झालेली नाही. आयुक्तांनी १ एप्रिलला नालेसफाई सुरू होणार असा दावा
केला होता तो दावा फोल ठरला आहे.
मीरा-भाईंदर शहरात दरवर्षी पावसाळी नालेसफाई उशिरा सुरू केली जाते. परंतु यावर्षी पावसाळी नालेसफाई १ एप्रिलला सुरू करून ३१ मे पर्यंत पूर्ण के ली जाईल, असा दावा आयुक्त दिलीप ढोले यांनी के ला होता. परंतु अद्याप नालेसफाई सुरू झालेले नाही. नालेसफाई उशिरा सुरू के ल्यामुळे घाई घाईने व अर्धवट के ली जाते असा आरोप के ला जातो. नालेसफाई करणाऱ्या मजुरांना वेतन कमी दिले जाते तसेच नाल्यातील काढलेला गाळ रस्त्याच्या बाजूला ठे वला जातो. तो गाळ अनेक दिवस तसाच पडून राहिल्यामुळे तो पुन्हा गटारात जातो.
पावसाळा सुरू झाल्यामुळे पावसाळ्यात शहरात पाणी भरते त्यामुळे शहरातील नागरिकांचे मोठे नुकसान होते. नालेसफाईसाठी करोडो रुपये खर्च करूनही शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. १२ एप्रिल रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये नालेसफाई निविदेला आर्थिक मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी नालेसफाई सुरु होणार नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे यंदाही शहरात पावसाचे पाणी भरणार असा प्रश्न उपस्थित के ला जात आहे. एप्रिल अर्धा महिना संपत आला तरीही नालेसफाई सुरू झालेली नाही. त्यामुळे आयुक्त दिलीप ढोले यांनी १ एप्रिलला नालेसफाई सुरू होणार असल्याचा के लेला दावा फोल ठरला आहे. नालेसफाईच्या निविदेला स्थायी समितीची आर्थिक मंजुरी मिळाली आहे. एक दोन दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण करून नालेसफाईस लवकरच सुरुवात केली जाणार आहे, असे आरोग्य विभागाचे उपायुक्त रवी पवार यांनी सांगितले.