अंबरनाथ: अंबरनाथमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय सावंत यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेतील राजकीय घडामोडींनंतर बंडाळीनंतर सावंत हे शिवसेनेच्या शिंदे गटात गेलेले दुसरे शहरप्रमुख आहेत.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत श्री. सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. खासदार आपल्या भेटीला या कार्यक्रमानिमित्त खासदार डॉ. शिंदे अंबरनाथमध्ये आले होते. चार महिन्यांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अंबरनाथचे शहरप्रमुख श्रीनिवास वाल्मीकी यांनी पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर ठाकरे गटाने पुन्हा कार्यकर्त्यांची जमवाजमव करत संजय सावंत यांना ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाची जबाबदारी सोपवली होती.
सचिन अहिर यांच्या उपस्थितीत संजय सावंत यांनी शहरात ठाकरे गटाच्या शाखेचेही उदघाटन केले होते. मात्र तोच शनिवारी जनता दरबारासाठी आलेल्या खासदार डॉ. शिंदे यांच्या उपस्थितीत संजय सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा एकदा शहरप्रमुख शोधण्याची वेळ आली आहे.