शहापूरजवळील पुरातन लेण्या नामशेष होण्याच्या मार्गावर

१२ व्या शतकातील लेण्यांकडे पुरातत्व दुर्लक्ष

शहापूर : शहापूर शहराजवळील आ ट ग ा व – पु ण धे येथ ी ल इतिहासकालीन पांडवलेणी हा असाच एक अनमोल ठेवा असून सध्या मात्र तो नामशेष होण्याच्या
मार्गावर आहे. पुरातत्त्व विभागाने वेळीच याकडे लक्ष देऊन त्याचा जीर्णोद्धार करण्याची मागणी इतिहासप्रेमींनी केली आह.े

मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा दरम्यान आटगाव स्थानक आहे. शहापूरपासून केवळ पाच किमी अं तरावरील आटगावपासून अगदी जवळ म्हणजे केवळ दोन किमीच्या अं तरावर पुणधेजवळ एक टेकडी आहे. या टेकडीच्या शिखरावर भग्नावस्थेत ही लेणी आहेत. या लेण्यांमध्ये अनेक रेखीव शिल्पे आहेत. या लेण्यांची उभारणी के व्हा झाली, ती कुणी बांधली, याविषयी कु ठे च माहिती उपलब्ध नाही.मात्र या लेण्यांचा काळ इ.स.९०० ते१२०० असावा असा अं दाज आहे. पुणधेपासून अगदी अर्धा किमीच्या अं तरावरील या लेण्यांकडेपुणधेगावातून जाणारी एक पायवाट आहे. काट्याकुट्यांनी वेढलेल्या या रस्त्यानेटेकडी चढल्यावर प्रथम आपणास दिसतात, ते प्रवेश द्वाराजवळील दोन स्तंभ. त्यावर आकर्षक कोरीवकाम असून पुरातनकाळातील शिल्पकलेचा आविष्कार दिसतो. मध्यभागी एक मंदिर असून या मंदिराला घडीव दगडांचा पाया असून त्यावर मोठी शिल्पे दिसतात. या लेण्यांना भेट दिल्यावर काही शिल्पशिला इतस्तत: पडलेल्या दिसतात. या लेण्यांना भेट देण्यासाठी अनेक पर्यटक मोठ्या आस्थेनेयेतात. मात्र, इथे पिण्यासाठी पाणी नाही, जाण्यासाठी रस्ता नाही की, विश्रांतीगृहही नाही. रस्त्यावरील दगडगोटेतसेच काट्याकुट्यांमधून रस्ता काढत जावे
लागते.सध्या पांडवलेण्यांत करवंदांच्या झाडीत सापडलेल्या देवीची स्थापना करण्यात आली असून अधूनमधून या देवीची पूजा के ली जाते. नवरात्र तसेच रामनवमीला येथेउत्सव भरतो. लेण्यांतील अलंकारिक वैभव के व्हाच नष्ट झालेआहे. त्यातील सौंदर्य पुन्हा प्रस्थापित करायचा, असेल तर या लेण्यांच्या जीर्णोद्धाराची गरज आहे. या लेण्यांतील शिलांचेआणि स्तंभांवरील शिल्पांचेघारापुरीतील लेण्यांमधील शिल्पांशी साधर्म्य वाटते. इ.स. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुरबाड, वाडा, म्हसा भागांतील शैवपंथीय तसेच ग्रामदेवतेची मंदिरेमोगलांच्या आक्र मणानेउद्ध्वस्त झाली, असे इतिहास सांगतो.

पुणधेयेथील भग्नावस्थेतील ही लेणीही बहुधा त्याच्या तडाख्यात सापडली असावीत.ऐतिहासिक वारसा असलेल्या आटगावपुणधेतील लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी अनेक पर्यटक येतात. या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्त्यांची सुविधा नाही. पाणी, रस्,तेविश्रांतीगृह, सुरक्षितता अशा कोणत्याच सुविधा येथेनसल्यानेइतिहास
अभ्यासक नाराज होतात. येथेमोठ्या प्रमाणात शिल्पे विखुरलेल्या स्थितीत पडून असल्यानेती नामशेष होण्याचा धोका आहे. याकडेपुरातत्त्व विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. स्थनिक वनविभागाकडून याठिकाणी काळजी म्हणून काँक्रिटीकरण करण्यात आलेआहे, परंतुसध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिल्पे पडली असून काही पडण्याच्या स्थितीत आहेत. वनसंवर्धनाप्रमाणेच अशी पुरातन प्राचीन लेणी जोपासली पाहिजेत, अशी मागणी सह्याद्री वनसंवर्धन संस्थेचे अध्यक्ष निलेश डोहळेयांनी के ली आहे.