आ. संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली देणार लढा
ठाणे: पुनर्विकास योजनांमध्ये फसवणूक झालेल्या कुटुंबांनी आज ठाण्यातील घंटाळी सहयोग मंदिर हॉल येथे आक्रोश बैठक घेतली. यावेळी त्यांनी आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली लढा देण्याचा एकमुखी निर्णय घेतला. या बैठकीत 16 सोसायटयांचे जवळ-जवळ 200 सभासद उपस्थित होते.
जोशी इंटरप्रायझेसच्या कळके आणि त्यांच्या भगिदरांनी शेकडो कुटुंबांची जाणून-बुजून फसवणूक केली आहे. वर्षभर भाडेपण नाही. अनेकांनी साठवलेल्या पुंजीमधून घरे घेतली होती. पण या फसवणुकीमुळे ही कुटुंबे आपल्या हक्काच्या घरांपासून वंचित आहेत. ठाणे शहरात अशा अनेक योजनांमधून सर्वसामान्य कुटुंबांची फसवणूक होत आहे. अशा कुटुंबांनी एकत्र येत एका आक्रोश बैठकीचे आयोजन आज केले होते. यावेळी त्यांनी आमदार संजय केळकर यांना आमंत्रित केले होते. यावेळी विद्याधार वैशंपायन, ॲड. सुभाष काळे, माजी नगरसेवक सुनेश जोशी उपस्थित होते.
या बैठकीत फसवणूक झालेल्या सदस्यांनी आपली मते मांडली. कळके आणि त्यांच्या भागिदारांनी आमची घराची स्वप्ने धुळीस मिळवली आहेत. वर्षभर भाडेपण नाही. 2023 ला आम्हाला भाडे दिले तेही आम्ही सतत तगादा लावल्यामुळे आम्हाला मिळाले.
आ. केळकर यांनी पाठबळ दिल्यामुळे आमच्या लढाईला मोठ बळ मिळाले असून आम्ही एकत्रित हा लढा आ. केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली देणार असल्याचे या सदस्यांनी सांगितले.
यावेळी आ. केळकर यांनी फसवणूक झालेल्या कुटुंबासोबत शेवटपर्यंत उभे राहून न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पूनर्विकासाच्या नावाखाली कुटुंबांची अशा फसवणूक करण्याऱ्या विकासकांची जिथे-जिथे कामे सुरु असतील त्यावर टाच आणली पाहिजे. हे मोकाट सुटले तर पुनर्विकासाच्या नावाखाली सामान्य कुटुंबे उद्ध्वस्त होतील. या फसवणूक झालेल्या कुटुंबांना बरोबर घेऊन त्यांना मुदतीत न्याय मिळावा याकरिता मला जे-जे म्हणून करावे लागेल, ते मी करेन असे आ. केळकर यांनी सांगितले.