अंबरनाथ: अंबरनाथचा रहिवासी निखिल चौधरी आणि आघाडीची मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री गायत्री दातार यांचा नको हा बहाणा हा पहिलाच म्युझिक अल्बम उद्या व्हेलनटाईच्या दिवशी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
निखिल चौधरी याच्याबरोबर झी मराठी वरील ‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातार आणि निमिषा चौधरी प्रस्तुत सौरभ चौघुले दिग्दर्शित नको हा बहाणा 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनच्या मुहूर्तावर रिलीज होत आहे.
गाण्याचे गायक आणि संगीतकार देव अहिरराव आहेत तर संकेत जाधव यांनी गाणे शब्दबद्ध केले आहे, राहुल दास यांनी गाण्याचे छायाचित्रण केले आहे.
अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचा निखिल चौधरी हा मुलगा असून न्यूयॉर्क येथे फिल्म ऍकेडमीमध्ये निखिल याने अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अक्षय खन्नासोबत सब कुशल मंगल ह्या हिंदी चित्रपटात भूमिका केली होती, तसेच निर्माता प्राची मनमोहन बरोबर मिशन मुंबई या वेबसिरीजची निर्मिती केली होती. सिने दिग्दर्शक महेंद्र पाटील आणि संकेत जाधव यांनी निखिलला मार्गदर्शन केले आहे. झी म्युझिक मराठी चॅनलवर हा अल्बम रिलीज होत आहे