अंबरनाथ: यंदा पावसाळा उशिराने सुरू झाला असला तरी अंबरनाथच्या पूर्व भागाला पाणी पुरवठा करणारे चिखलोली धरण भरून वाहू लागले आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे.
यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मागील आठवड्यात आणि गेल्या दोन, चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने धरण क्षेत्रात दमदार हजेरी लावली आणि आज मंगळवार 18 जुलै 2023 रोजी चिखलोली धरण ओव्हर फ्लो झाल्याचे पहावयास मिळाले. मागील वर्षी 13 जुलै 2022 रोजी धरण ओव्हर फ्लो झाले होते.
अंबरनाथच्या शिवाजीनगर, वडवली, महालक्ष्मीनगर आदी परिसराला चिखलोली धरणातून पाणी पुरवठा केला जातो. शहरातील इतर भागात बदलापूरच्या बरेज धरणातून पाणी पुरवठा केला जातो