अंबरनाथचा कराटेपटू रोहित भोरे लिम्का बुकमध्ये टॉप वनला

अंबरनाथ : अंबरनाथ येथील कराटे खेळाडू रोहित भोरे यांनी  केलेल्या लिंमका बुक ऑफ रेकॉर्डची नोंद ही लिंमका बुक ऑफ रेकॉर्ड्स २०२०-२२ मध्ये टॉप १० मधून टॉप एकमध्ये करण्यात आली आहे.

अंबरनाथचा रहिवासी असलेल्या रोहित भोरे यांनी कराटे क्रीडा प्रकारात छाती स्तरावरील (मोस्ट चुदान झुकी कराटे पंचेस) च्या प्रकारात एक मिनिटात तब्बल २१७ पंचेस मारून विक्रम नोंदविला होता. रोहितला हा रेकॉर्ड करण्यासाठी एक मिनिटात १५० पंचेस मारण्याचे आव्हान दिले होते, परंतु त्याने एका मिनिटात २१७ पंचेस मारून आपला ठसा लिमका बुक ऑफ रेकॉर्ड २०२०-२२ मध्ये नोंदविला होता.

रोहित भोरे यांनी नवी दिल्ली येथील रेल भवन येथे रेल्वेचे आयआरएस उपसचिव एस. के. जाधव यांच्या हस्ते लिंमका बुक ऑफ़ रेकॅार्ड २०२०-२२ चे प्रमाणपत्र व पुस्तक स्वीकारले. श्री.जाधव यांनी देखील रोहितच्या कामगिरीबाबत रोहितचे अभिनंदन केले. देशातील उत्कृष्ट अशा रेकॉर्ड्स यादीमध्ये  अंबरनाथसारख्या ग्रामीण भागातून खेळाडूंची नावे नोंदविली जातात हे अभिनन्दनीय असल्याचे प्रशंसोद्गार श्री. जाधव यांनी याप्रसंगी काढले.