आलिया भट्ट होणार आई, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आलिया आणि रणबीर १४ एप्रिल रोजी लग्न बंधनात अडकले. तरी सुद्धा अजूनही त्यांच्या लग्नाच्या चर्चा या सुरुच आहेत. या सगळ्यात आता आलिया आणि रणबीरने त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आलिया आई होणार आहे.

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. आलियाने शेअर केलेल्या या फोटोत ती रुग्णालयात असल्याचे दिसत आहे. याशिवाय त्या फोटोत रणबीर आलियाच्या बाजुला असल्याचे दिसत आहे. याशिवाय आलियाने नवीन पाहुण्याची चाहूल दर्शवणारा तिने सिंहाच्या कुटुंबाचा प्रातिनिधक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत “आमचं बाळं लवकरच येतं आहे”, असे कॅप्शन दिले आहे.

आलियाने शेअर केलेल्या या पोस्टवर चित्रपटसृष्टीतील अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आलियाची आई सोनी राजदान यांनी आलियाच्या पोस्टवर ‘तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा’. तर करण जोहरने ‘आनंद हृदयात मावत नाही’. प्रियांकाने तुम्हाला शुभेच्छा,’ मी प्रतिक्षा करू शकत नाही.’ अशी कमेंट केली आहे.

रणबीर आणि आलिया लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट पहिला भाग आहे आणि याचे आणखी दोन भाग येणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्याही भूमिका आहेत.