मनसेने केला विरोध
अंबरनाथ : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा स्वरक्षणार्थ पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. अक्षयचा अंत्यविधी करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने नकार दिला, शिवाय मनसेने देखील अंबरनाथमध्ये अक्षयचा अंत्यविधी होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे.
अक्षय शिंदेच्या मृतदेहावर बदलापुरात अंत्यसंस्कार करू देणार नसल्याची भूमिका नागरिकांनी घेतली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अक्षयच्या अंत्यविधीसाठी अंबरनाथमध्ये आज गुरुवारी जागेची चाचपणी केली जात होती. मात्र अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने त्याच्या अंत्यविधीसाठी नकार दिल्याचे समजते.
दरम्यान महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनीही अक्षय शिंदे याचा अंबरनाथमध्ये अंत्यविधीला विरोध दर्शविला आहे. त्याबाबतचे लेखी निवेदन मनसेतर्फे प्रशासनाला देण्यात आले.