अजित लामखडेची मुंबईच्या संघात निवड

नवी मुंबई: सानपाडा येथील रहिवासी व नेरुळ येथे एसआयईएस महाविद्यालय नेरुळ येथे द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला अजित लामखडे याची मुंबई विद्यापीठाच्या धनुर्विद्या खेळाच्या संघात निवड करण्यात आली आहे.

२४ ते २७ डिसेंबर दरम्यान भुवनेश्वर, ओरीसा येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ धनुर्विद्या (पुरुष व महिला) चॅम्पियनशिप २०२४-२५ या स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाच्या स्पोर्टस आणि शारीरिक शिक्षण विभागाकडून तसेच कोल्हापूर येथे ३ ते ५ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या २१ व्या सिनियर स्टेट आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी मुंबई डिस्ट्रिक्ट आर्चरी असोसिएशनच्या मुंबई जिल्हा संघात निवड करण्यात आली आहे.

अजित याचे कुटुंब सानपाडा गावात एका लहान खोलीत भाड्याने रहातात. त्याचे वडील शिवराम लामखडे हे बेस्टमध्ये ड्रायव्हर आहेत. आई वैशाली या घरकाम करतात. घरची परिस्थिती बेताची असताना अजित याने धनुर्विद्या खेळात प्रावीण्य मिळवले असून या यशामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे