घरकुलांना आता ५० हजारांचे अतिरीक्त अनुदान

धाराशिव: प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांना आता ग्रामीण भागात 50 हजारांचे अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी याबाबतचा निर्णय घेतला असून, बजेटमध्येही त्याबाबत तरतूद केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. ग्रामीण भागात घरकुलासाठी दोन लाख 10 हजार रुपयापर्यंत निधी मिळणार आहे. अतिरिक्त अनुदानाचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे गोरे म्हणाले.

वर्षभरात 20 लाख घरकुलांचे काम पूर्ण करण्याचा सरकारचा संकल्प असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. धाराशिव येथील कार्यक्रमात जयकुमार गोरे बोलत होते. पहिल्या टप्प्यातील 10 लाख घरकुलांचा पहिला हप्ता अमित शहा यांच्या उपस्थितीत कालच वितरित झाल्याचे गोरे म्हणाले.

महाराष्ट्र राज्याला देशातील सर्वात मोठं घरकुलांचं उद्दीष्ट मिळालं आहे. 20 लाख घरांचे उद्दीष्ट राज्याला मिळालं आहे. देवेंद्र फडणविस यांनी केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला होता, असे जयकुमार गोरे म्हणाले. 100 दिवसांचा जो कार्यक्रम दिला होता, त्यामध्ये पहिल्या 45 दिवसात आम्ही 100 टक्के घरांना मान्यता दिली आहे. यामध्ये आम्ही 10 लाख 34 हजार घरांना पहिला हप्ता देखील आपण वितरीत केला असल्याचे जयकुमार गोरे म्हणाले. येणाऱ्या 15 दिवसात राहिलेल्या 10 लाख घरांना आम्ही हप्ता देऊन काम सुरु करणार असल्याचे गोरे म्हणाले. वर्षभरात आम्ही 20 लाख घरकुले बांधणार असल्याचे जयकुमार गोरे म्हणाले.

100 टक्के रिझल्ट यावा असे काम सुरु केले आहे. सगळ्यांना याबाबतच्या सूचना दिल्या असल्याचे गोरे म्हणाले. घरांच्या किंमतीमध्ये ग्रामीण भागात वाढ करण्यात आऐली आहे. आम्ही जे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याची माहिती मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे.