ठाणे : ठाणे महापालिके च्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या साके त-बाळकु म,कोलशेत वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट कामाची महापालिका अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी पाहणी करून सर्वच कामांची गती वाढवून वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
ठाणे शहरातील नागरिकांसाठी मनोरंजनात्मक जागा विकसित करून पर्यटनास चालना देण्यासाठी महापालिके च्या ठाणे स्मार्ट सिटी लि.अं तर्गत वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट
प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्यासाके तबाळकु म, कोलशेत वॉटर फ्रं ट डेव्हलपमेंटच्या कामाची महापालिका अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यामध्ये कोलशेत येथे १३०० मीटर पाथवेचे काम प्रगतीपथावर असून उर्वरित काम तातडीनेपूर्ण करण्याचे निर्देश देतानाच सुशोभीकरण, संरक्षण भिंती तसेच उद्यान विषयक कामे आदी कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच साकेत-बाळकूम वॉटर फ्रंट येथील कामाची पाहणी करून या परिसरात मातीचा भराव टाकून जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे, पार्किं ग परिसर, सायकल ट्क, ह रॅ र्बल कॉर्नर, शौचालय तसेच अँ म्पी थेटरची कामे करण्याच्यासूचनाही त्यांनीसंबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी मुख्य तांत्रिक अधिकारी अभियंता प्रवीण पापळकर, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, सल्लागार, संबंधित ठे के दार तसेच संबंधित अभियंता आदी उपस्थित होत.