ठाणे : काल शून्य रूग्ण मिळाल्यानंतर आज पुन्हा नवीन दोन नवीन रुग्णांची भर पडली आहे. सातजण कोरोनामुक्त झाले आहेत. रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ६३,६४३ दिवसांवर गेला आहे. सुदैवाने आजही एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
महापालिका हद्दीतील वर्तकनगर आणि मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात प्रत्येकी एक रूग्ण सापडला असून उर्वरित सात प्रभाग समिती परिसरात शून्य रूग्ण नोंदवले गेले आहेत. विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी सात जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१,४९६ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालय आणि घरी अवघ्या २० जणांवर उपचार सुरू आहेत. आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २,१२७जण मृत्युमुखी पडले आहेत.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ५५६ नागरिकांची कोरोना चाचणी घेतली होती. त्यामध्ये दोन जण बाधित सापडले. आत्तापर्यंत २३ लाख ९६,५३५ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,६४३ रूग्ण बाधित मिळाले आहेत.