तिसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णसंख्या
ठाणे – शहरात आज तिसऱ्या लाटेतील सर्वात कमी ११ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सर्वच प्रभाग समिती क्षेत्रात एक आकडी रूग्ण मिळाले असून चार प्रभाग समिती क्षेत्रात एकही रूग्ण मिळाला नाही. तर २८ जण कोरोना मुक्त झाले आहेत.
महापालिका हद्दीत सर्वाधिक चार रूग्ण वर्तकनगर प्रभाग समिती येथे सापडले आहेत. तीन जण माजीवडा मानपाडा तर दोन रूग्ण उथळसर प्रभाग समिती भागात वाढले आहेत. प्रत्येकी एक रुग्ण लोकमान्य सावरकर नगर आणि वागळे प्रभाग समिती भागात सापडले आहेत. तर एकही रूग्ण नौपाडा कोपरी, कळवा, मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती परिसरात सापडला नाही.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रूग्णांपैकी २८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१ हजार दोनशे रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. तर रुग्णालयात आणि घरी सध्या १४० जणांवर उपचार सुरू आहेत. एकाही रुग्णाचा मृत्यू दिवसभरात झाला नाही. आत्तापर्यंत दोन हजार १२७ रूग्ण दगावले आहेत.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ७८० नागरिकांची चाचणी केली होती. त्यामध्ये ११ जण पॉझिटिव्ह मिळाले आहेत. आत्तापर्यंत २३ लाख ८२ हजार ७१० ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये एक लाख ८३ हजार ४६७ जण बाधित मिळाले आहेत.