ठाणे – शहरातील कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली असून कोरोनाचा अंत जवळ आला आहे. शहरात आज २१ नवीन रूग्ण सापडले असून पाच प्रभाग समिती क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी एकही रूग्ण सापडला नाही. तर २७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
महापालिका हद्दीतील माजीवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात सर्वात जास्त ११ रूग्ण सापडले असून सात जण वर्तकनगर परिसरातील तर दोन रूग्ण उथळसर येथील आणि एक रुग्ण दिवा प्रभाग समिती परिसरात सापडला आहे. लोकमान्य सावरकर, नौपाडा कोपरी, वागळे, कळवा आणि मुंब्रा या प्रभाग समिती क्षेत्रात एकाही रुग्णाची नोंद करण्यात आली नाही. विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रूग्णांपैकी २७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१ हजार १०८ जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी उपचार घेणाऱ्यांची संख्या १८६ आहे.
आज दिवसभरात एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत दोन हजार १२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महापालिका प्रशासनाने काल शहरांतील एक हजार २६८ नागरिकांची चाचणी केली होती त्यापैकी २१ जण कोरोनाबाधित आहेत. आत्तापर्यंत २३ लाख ७९ हजार ७७९ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये एक लाख ८३ हजार ४२१ जण बाधित झाले होते.