भिवंडी : तालुक्यातील वेहेळे येथील माजी सरपंच दुर्जन भोईर, माजी सरपंच संतोष भोईर, प्रहार जनशक्ती पक्षाचे भिवंडी ग्रामीण विधानसभा अध्यक्ष भानुदास पाटील यांच्यासह शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, प्रहार आदी पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला.
केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांचे भाजपामध्ये स्वागत केले. या कार्यकर्त्यांमध्ये काही पूर्वाश्रमीचे भाजपाचेच कार्यकर्ते आहेत.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या संघटनात्मक ताकदीत वाढ होत आहे. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पक्षांतील कार्यकर्ते भाजपाचा झेंडा खांद्यावर घेत आहेत. काही दिवसांपूर्वी वाडा तालुक्यातील काही कार्यकर्त्यंनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. तर आज कपिल पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात भिवंडी तालुक्यातील भाजपेतर पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये स्वागत केले. भिवंडी ग्रामीण मतदारसंघात भाजपाची संघटना मजबूत करण्याबरोबरच ग्रामस्थ व शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.
भाजपात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेनेचे मंगेश भोईर, लक्ष्मण म्हात्रे, भोलेनाथ मुकादम, रामचंद्र भोईर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.