वर्तकनगर प्रभाग समितीच्या हद्दीत कारवाई

ठाणे : अतिक्रमण विभागाचा पदभार स्वीकारताच महेश आहेर यांनी वर्तकनगर येथे भर चौकात सुरू असलेल्या चार गाळ्यांवर बुलडोजर फिरवला त्यामुळे अनधिकृ त
बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

बेथनी रुग्णालय येथे सरकारी भूखंडावर तळ अधिक एक मजल्याचे वाणिज्य गाळ्याचे बांधकाम सुरूहोते, त्याकडे वर्तकनगर प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांनी अर्थपूर्णदर्ल ु क्ष के ले होते. हे काम अंतिम टप्प्यात आले होते. काल महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी महेश आहेर यांना अतिक्रमण विभागाचे समन्वयक
तथा नियंत्रक या पदाची जबाबदारी दिली. त्याचा पदभार त्यांनी आज स्वीकारून तीन जेसीबीच्या मदतीने तळ अधिक एक मजल्याचे बांधकाम जमीनदोस्त के ले. या कारवाईमुळे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे.

मागील चार ते पाच महिन्यांपासून हे काम सुरू होते. त्याबाबत तक्रार के ली होती, परंतु या अनधिकृ त बांधकामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष के ले जात होते, असे या भागातील जागरूक नागरिकांनी ‘ठाणेवैभव’ला सांगितले.