शुद्ध पाणी देणे हॉटेल्सची जबाबदारी- एफडीए
ठाणे : ठाण्यातील कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना आधी पाणी दिले जाते. मात्र मुंबई व ठाण्यातील काही बड्या हॉटेलमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बाटलीबंद पाण्याची खरेदी सक्ती केली जात आहे. काही ठिकाणी तर ग्लासातील पाण्याऐवजी पाण्याच्या बाटल्या ग्राहकांना देण्यात येत आहेत.
हॉटेलमध्ये जाणा-या सर्व ग्राहकांना जेवणासह शुद्ध पाणी देण्याचीही हॉटेल चालकाची जबाबदारी आहे.
अशा बाटलीबंद पाण्याची सक्ती होत असल्यास तक्रार ग्राहक मंचाकडे करता येते, असे एफडीएच्या वरिष्ठ अधिका-याने स्पष्ट केले. परंतु, हॉटेलमध्ये येणा-या ग्राहकांना अशुद्ध पाणी दिल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही करण्यात येईल आणि दुप्पट किंवा अगदी तिप्पट किंमत लावू नये. पण बाटलीबंद पाणी विकले जाते, असा इशारा अन्न आणि औषध प्रशासनाने दिला.
हॉटेलमध्ये अशा बाटलीबंद पाण्याची सक्ती होत असल्यास किंवा त्याची किंमत जास्त आकारल्यास ग्राहकांनी त्यासाठी जागरूक राहणे अपेक्षित आहे व अशुद्ध बाटलीबंद पाणी देण्यात आले तर किंवा साधे पाणीही अशुद्ध दिल्याबद्दल संबंधित हॉटेलवर कारवाई होऊ शकते, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभगाचे ठाण्याचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली