विकलांग डब्यात प्रवास करणाऱ्या १९८ प्रवाशांवर कारवाई

डोंबिवली : रेल्वे प्रशासनाने रेल्वे गाडीत विकलांगांकरिता राखीव डबा ठेवला आहे. मात्र इतर डब्यातील गर्दीचे कारण पुढे करत सामान्य प्रवासी विकलांगांच्या डब्यातून प्रवास करतात. डोंबिवली रेल्वे पोलिसांनी अशा प्रवाशांवर कारवाई सुरु केली आहे.

बुधवारी 21 तारखेला साडे पाच ते सात यावेळेत डोंबिवली रेल्वे स्टेशन येथे लोकल ट्रेनमधील विकलांग डब्यातून अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या ३४ प्रवाशांवर डोंबिवली रेल्वे पोलीस ठाणे व रेल्वे सुरक्षा बल (डोंबिवली) यांनी संयुक्तपणे कारवाई केली. या कारवाईत डोंबिवली रेल्वे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे, दोन अधिकारी, 20 अंमलदार तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे दोन अधिकारी व पाच अंमलदार हजर होते. डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत जानेवारी 2025 ते मे अखेरीस दिव्यांग डब्यामध्ये प्रवास करणाऱ्या 198 अनधिकृत प्रवाशांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी दिली.