एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या आरोपीला इराणी वस्तीतून अटक

कल्याण : एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक करण्याची कामगिरी पोलीस उपआयुक्त विशेष कारवाई पथक व खडकपाडा पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे. हाशमी जाफर हुसैन जाफरी (३३) रा. इराणी नगर, अटाळी असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीचे 15 ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे.

कल्याण परिमंडळ ३ च्या विशेष कारवाईचे पथकाचे अधिकारी व खडकपाडा पोलीस ठाणेतील पोलीस निरीक्षक गुन्हे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अटाळी परिसरात बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणारे पेडलर व अभिलेखावरील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरीता खाजगी वाहनांवरून प्रतिबंध गस्तीकरीता रवाना झाले होते. हे पथक बुधवारी संध्याकाळच्या सुमारास कल्याण बंदरपाडा कडून शिवमंदिरकडे जाणाऱ्या गावठाण रोड या ठिकाणी आले असता या ठिकाणी पोलीस पथकास रोडच्या कडेला उभ्या असलेल्या एका काळया रंगाची सुझुकी कंपनीची ऍक्सेस स्कुटीवरील इसमाच्या हालचाली संशयीत वाटल्या.

तेंव्हा पोलीस पथकाने त्याचा पंचासमक्ष अंगझडती पंचनामा करण्यात आला असता त्याच्या ताब्यातून १५ ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम. डी.) सुमारे ३० हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून हाशमी जाफर हुसैन जाफरी याला खडकपाडा पोलीस ठाणे येथे अटक करण्यात आली आहे. पुढील तपास चालु असून या आरोपीवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात दोन आणि मानपाडा पोलीस ठाण्यात एक असे यापूर्वी तीन गुन्हेही दाखल आहेत.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, खडकपाडा पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. विजय नाईक, स.पो.नि. अनिल गायकवाड, स.पो.उपनिरी. जितेंद्र ठोके, पो.शि. अमित शिंदे, खुशाल नेरकर, राहुल शिंदे, पोलीस उप आयुक्त विशेष कारवाई पथक, तसेच खडकपाडा पो.स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी स.पो.नि. विजय गायकवाड, अंमलदार पो. शि. अनंत देसले, सतिष मुपडे यांनी केली आहे.