बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगणा-या आरोपीस अटक

भिवंडी: भिवंडी गुन्हे शाखा, घटक-२ मधील कर्मचाऱ्यास मिळालेल्या माहितीनुसार शांतीनगर भागात बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगणा-या आरोपीस अटक केली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अभिलेखावरील सराईत गुन्हेगार नफीस उर्फ तोतला हा शांतीनगर पाईपलाईन रोड येथे आपल्या कब्जात अवैधरीत्या अग्निशस्त्र बाळगुन फिरत होता. त्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा, घटक-२ भिवंडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून भादवडनाक्याकडून बिलालनगरकडे जाणाऱ्या जलवाहिनी रोडवर, ट्रान्सफार्मरजवळ आरोपीस ताब्यात घेतले. सदर आरोपीचे नाव नफीस उर्फ तोतला दिलावर खान (२३) रा.शांतीनगर असून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडुन ०१ माऊझर पिस्टल (अग्निशस्त्र) व ०२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आले. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.