बदलापूरच्या मराठा बांधवांतर्फे आंदोलकांना ३०० किलो फरसाण

बदलापूर: बदलापूर शहरातील सकल मराठा समाजातील मराठा बांधवांनी, आंदोलनाच्या ठिकाणी असलेल्या मराठा बांधवांसाठी ३०० किलो फरसाण पोहचवण्याची जबाबदारी पार पाडली.

बदलापूर शहरातून अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अनेक मराठा नेत्यांनी पुढाकार घेत, आपापल्या परीने आर्थिक मदत गोळा करून, 300 किलो फरसाण विकत घेतले व हे सगळे फरसाण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आझाद मैदान परिसरात, जेवण आणि पाण्यासाठी त्रास सहन करत असलेल्या आंदोलनकर्त्या बांधवांपर्यंत पोहोचवले.

राज्यात काय तर देशभरातील मराठा बांधव एकत्रित येऊन हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अविनाश देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे बदलापूर शहरातून ३०० किलो फरसाण आंदोलनात सहभागी झालेल्या आणि राज्यातील विविध ठिकाणाहून आलेल्या, मराठा बांधवांसाठी देत आहोत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे जोपर्यंत उपोषण सुरू ठेवतील तोपर्यंत, मराठा बांधवांची रसद तुटू देणार नाही, असा पवित्रा बदलापूर शहरातील या मराठा नेत्यांनी घेतला आहे.