मुंबई: नवीन एग्जीट पोलनुसार टुडे चाणक्यने महायुतीला १७५ पेक्षा जास्त तर ॲक्सिस माय इंडियाच्या एग्जीट पोलनुसार १७८ जागांचा अंदाज वर्तविला आहे.
टूडे चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार भाजप-महायुतीला 175 जागा मिळू शकतात. यामध्ये 10 जागा वाढू शकतात, किंवा 10 जागा कमी देखील होऊ शकतात. काँग्रेस-महाविकास आघाडीला 100 जागा मिळू शकतात. 100 जागांमध्ये 10 जागा वाढू देखील शकतात, कमी देखील होऊ शकतात. इतर पक्ष-आघाडी यांना 13 जागा मिळू शकतात. यामध्ये पाच जागा वाढू किंवा कमी देखील होऊ शकतात.
भाजपच्या मतांची टक्केवारी 45 टक्के राहून यामध्ये तीन टक्क्यांची वाढ होऊ शकते. किंवा तीन टक्के मते कमी देखील होऊ शकतात. काँग्रेस मतांची टक्केवारी 39 टक्के राहून यामध्ये तीन टक्क्यांची वाढ किंवा कमी देखील होऊ शकते.
ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार भाजपा-महायुतीला १७८ ते २०० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला ८२ ते १०२ जागा मिळतील असा अंदाज आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल असेही या पोलने म्हटले आहे.
भाजपाला ९७ ते १०७ जागा, शिवसेना (एकनाथ शिंदे) ५३ ते ५८ जागा, राष्ट्रवादी (अजित पवार) २५ ते ३० जागा, काँग्रेस २८ ते ३६ जागा, शिवसेना (उद्धव ठाकरे) २६ ते ३२ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला २६ ते ३० जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.