ठाण्यात मनविसेच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर
ठाणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आं बेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन शिबीर
आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये अग्रगण्य नाव असलेल्या विजेता अके डमीचे सतीश जाधव या शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून गुरुवार, १४ एप्रिल रोजी सकाळी ९. ३० वाजता वीर सावरकर नगर येथील आर. जे. ठाकू र महाविद्यालयाच्या सभागृहात हे मार्गदर्शन शिबीर पार पडणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात महामानव डॉ. बाबासाहेब आं बेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे आवाहन महाराष्ट्र सैनिकांना के ले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्य संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ‘तरुणांनी देशसेवेसाठी प्रशासकीय अधिकारी व्हा’ या बाबासाहेबांच्या कानमंत्रानुसार सध्याच्या घडीला मराठी मुलांनी
प्रशासकीय सेवेत दाखल होण्याची गरज असल्याचे पाचंगे यांनी सांगितले.
या मुलांचा एमपीएससी, युपीएससी, रेल्वे, एसएससी, बँके तील प्रवेशाचा मार्ग सुकर होण्यासाठी या विनामूल्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पाचंगे यांनी दिली. यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकु मार राठोड, महादेव जगताप,संचालक चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, ठाणे महापालिका हे उपस्थित राहणार असून त्यांचेही मार्गदर्शन या शिबिराला उपस्थित राहणाऱ्या
विद्यार्थ्यांना मोलाचे ठरणार आहे. नोंदणीसाठी ९८१९७३१२१९ किं वा ७२०८८३३००६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.