ठाणे : कळवा परिसरातील लाखो कुटुंबियांसाठी असलेल्या एकमेव स्मशाभूमीची दूरवस्था झाली होती. या ठिकाणी अत्याधुनिक स्मशानभूमी उभारण्यात येत असून गृहमंत्री जितेंद्र आव्हाड आणि ठामपा आयुक्त विपीन शर्मा यांनी आज या कामाची पाहणी केली.
पूर्वीच्या नियोजनानुसार बांधलेल्या या स्मशनभूमीत तीन वर्षांपूर्वीपासून उपकरणे गंजली होती, पत्रे तुटले होते. त्यामुळे येथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी फरफट होत होती. स्मशाभूमीजवळ वस्ती वाढल्याने जवळ राहणाऱ्या नागरिकांना धूर व प्रदषणू ाचा त्रास सहन करावा लागत होता. रहिवासींच्या स्वास्थ्यावर व
श्वसनावर त्याचा परिणाम होत होता. या तक्रारींची दखल घेऊन त्यावेळी स्वर्गीय नगरसेवक मुकुंद केणी व माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी अत्याधुनिक स्मशानभूमी उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे पाठवून तत्कालीन आयुक्त संजय जयस्वाल यांच्याकडे पाठपुरावा केला होता. ही स्मशानभूमी नवी मुंबई महापालिकेने बांधलेल्या आधुनिक स्मशानभूमीसारखी करण्यासाठी या कामासाठी साडेसहा कोटी रुपये महापालिकेने निधी दिला आहे. परंतु गेले काही दिवस संथ गतीने काम सुरू होते. आज या कामाची पाहणी करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व ठाणे महापालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी भेट देऊन हे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रसंगी माजी विरोधी पक्ष नेत्या प्रमिलाताई केणी, माजी नगरसेविका मनाली पाटील, माजी नगरसेविका अपर्णा साळवी, उद्योजक मंदार केणी उपस्थित होते.
या अत्याधुनिक स्मशाभूमीत स्मोक न्युससं ओबोस्ट सिस्टीम उभारण्यात येणार असून या नव्या सिस्टीममुळे स्मशाभूमीत काम सुरू असणाऱ्या शववहिनीतून निर्माण होणारा धूर 70 टक्के कमी होणार आहे. तसेच स्मशाभूमीच्या प्रवेद्वाराजवळ ब्लॅक स्टोनचा वापर केला जाणार आहे. तसेच संपूर्ण प्रवेशद्वार शिल्पकलेच्या माध्यमातून साकारले जाणार आहे. नवीन डिझेल वाहिनी, फ्रिकॉस्ट कपाऊंड, वॉल सोलर दिवे, स्नानगृह, पार्किंग प्लाझा, पुरेशी बैठक व्यवस्था अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध
केल्या जात आहेत. ‘या स्मशानभूमीच्या दुसऱ्या टप्प्यातील आधुनिक काम करताना स्मशानभूमी इतर ठिकाणी स्थलांतर करावी लागणार असल्याने या कामाला उशीर होत आहे, लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू’, असे सार्वजनिक बांधकाम विभाग, कळवा प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता मनोज तायडे यांनी सांगितले.