भिवंडी: शहरातील दोन ठिकाणाहून दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी दोन पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. या घटनेने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ओमकार साळवे (७) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव असून तो फुलेनगर भागात खेळण्यास गेला असता तो परत घरी न आल्याने त्याचे वडील परमेश्वर साळवे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. दुसऱ्या घटनेत शहरातील राजीव गांधी नगर येथील किसन गौंड (१०) याचा अज्ञानपणाचा फायदा घेऊन त्याचे अपहरण झाल्याची तक्रार त्याचे वडील अरुणकुमार गौड यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.