आयुष्य, आर्य आणि विहान हॅरिस शिल्डमधे सेंट जोसेफ्स डोंबिवलीच्या विजयाचे शिल्पकार

२ नोव्हेंबर रोजी हॅरिस शिल्डच्या पहिल्या फेरीत सेंट जोसेफ्स हायस्कूल, डोंबिवलीने सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूलचा ४८४ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

आझाद मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सेंट जोसेफ्स हायस्कूल, डोंबिवलीने २८६ धावा केल्या. सलामीवीर विहान वाघ लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार आयुष आंबेकर आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा आर्या सगरे यांनी सावधपणे फलंदाजी केली आणि वाईट चेंडूचा पुरेपूर फायदा करून घेतला. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी २३१ धावांची नाबाद भागीदारी केली. आयुष आंबेकरने नाबाद १४२ आणि आर्या सगरेने नाबाद १२८ धावा ठोकल्या. विरोधी संघाला ४५ षटकांचा कोटा वेळेवर टाकता आला नाही, त्यामुळे पेनल्टी देण्यात आली आणि त्यामुळे एकूण धावसंख्या ५०० च्या पुढे गेली. सेंट जोसेफ्सच्या विहान वाघने उत्कृष्ट गोलंदाजी करून तीन विकेट्स पटकावल्या आणि विरोधी संघाला केवळ ७८ धावांत गुंडाळले.

आयुष आंबेकर, आर्या सागरे आणि विहान वाघ हे सर्वजण हृषिकेश पुराणिक यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवलीतील क्रिकेट एक्स्प्लेन्ड क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतात.